BENGALURU

देशाच्या डिजिटल जनगणनेला कर्नाटक राज्यातून प्रारंभ

Share

देशाचे भविष्य ठरवणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेला कर्नाटक राज्यात अधिकृत सुरुवात झाली आहे. राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी स्वतःच्या मोबाईलवरून आपली वैयक्तिक माहिती नोंदवून या मोहिमेचे उद्घाटन केले.

केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ अंतर्गत ‘स्वयं-गणना’ ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी बुधवारी स्वतः ऑनलाईन पद्धतीने माहिती भरून या मोहिमेचा श्रीगणेशा केला. १ ते १५ एप्रिल या काळात नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या साहाय्याने ५ ते १० मिनिटांत आपली नोंदणी पूर्ण करावी आणि प्राप्त झालेला अर्ज क्रमांक १६ एप्रिलनंतर घरोघरी येणाऱ्या गणकांना द्यावा, असे आवाहन शालिनी रजनीश यांनी केले आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुरक्षित असून अचूक जनगणनेमुळेच आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी देशाला मदत होईल, असा विश्वास शालिनी रजनीश यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी जनगणना संचालक रामचंद्रन यांनी मुख्य सचिवांना स्वयं-गणना व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली.

Tags: