Accident

धारवाडमध्ये ‘हिट अँड रन’ प्रकरणातील ट्रक पोलिसांच्या ताब्यात

Share

धारवाड शहर वाहतूक पोलीस ठाण्याच्या मर्यादेत कारला पाठीमागून जोराची धडक देऊन फरार झालेल्या ट्रकचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अपघातानंतर ट्रकसह पळ काढणाऱ्या चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून वाहन जप्त केले आहे.

धारवाड राष्ट्रीय महामार्गावर KA-01, MW-1447 या क्रमांकाच्या आय-२० कारला एका ट्रकने पाठीमागून भीषण धडक दिली होती. या अपघातात कारच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, धडक दिल्यानंतर साधी माणुसकी न दाखवता किंवा विचारपूस न करता ट्रक चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून वेगाने पसार झाला होता.

याप्रकरणी कार मालकाने दिलेल्या तक्रारीवरून वाहतूक पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून अखेर संबंधित ट्रकचा छडा लावला. पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेची नोंद धारवाड वाहतूक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags: