बेळगावमधील सीमा लढ्याला आता नवीन बळ मिळाले असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाली आहे. यानिमित्त सीमाभागातील युवा समितीने मरगाळे यांचा सत्कार करून सीमाप्रश्नी पुढील आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा केली.

चळवळीच्या माध्यमातून जनसामान्यांची मने जिंकणारे प्रमाणिक कार्यकर्ते प्रकाश मरगाळे यांची मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने बेळगावमधील मराठी भाषिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी मरगाळे यांना शुभेच्छा दिल्या. मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली सीमा लढ्याला नवी दिशा मिळणार असून लाखो मराठी भाषिकांना न्याय मिळेल, असा विश्वास शुभम शेळके यांनी व्यक्त केला.
युवा समितीचा सत्कार स्वीकारल्यानंतर प्रकाश मरगाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सीमाभागातील जनता आजही लढ्यासाठी पूर्णपणे तयार असून येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक प्रखरपणे लढले जाईल, अशी ग्वाही प्रकाश मरगाळे यांनी दिली.
या प्रसंगी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, शिवाजीराव हवळ्ळान्नाचे, अशोक घागवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजित धामणेकर, रणजित हवळ्ळान्नाचे, रमेश माळवी, सूरज जाधव यांच्यासह येळ्ळूर भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments