Belagavi

कंग्राळी बुद्रुकमधील शिक्षक एस. एस. वन्नुर सेवानिवृत्त

Share

बेळगावमधील कंग्राळी बुद्रुक येथील सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत प्रदीर्घ सेवा बजावलेले शिक्षक एस. एस. वन्नुर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना शिक्षिका आष्मा नाईक यांनी निवृत्त शिक्षकांचा सन्मान करणे हे अत्यंत कौतुकास्पद कार्य असल्याचे सांगितले.

यावेळी शाहूनगर सरकारी हायस्कूल, मराठी शाळा शिक्षक वृंद आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या वतीने एस. एस. वन्नुर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय सुधारणा समितीचे अध्यक्ष रुद्रप्पा बळकुंदी होते. या सोहळ्याला अरुण पाटील, नमिता कांबळे, बी. वाय. हितारगौडर, सुरेश सक्रेण्णवर यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, माजी विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत आर. जे. भजंत्री यांनी केले, तर सी. के. कोलकार यांनी आभार मानले.

Tags: