चिंचवड तालुक्यातील बाणंतीकोडी येथे बाणंतीदेवीचा यात्रा महोत्सव अत्यंत दिमाखात पार पडला असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.

बाणंतीकोडी येथील बाणंतीदेवी यात्रा महोत्सवानिमित्त देवीला विशेष अभिषेक, पूजा आणि अलंकार अर्पण करून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी देवीची ओटी भरून दर्शन घेतले. महाद्वारापासून ते मंदिरापर्यंत सवाद्य ढोल-ताशांच्या गजरात आणि कुंभ-पालखीसह देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महोत्सवाच्या निमित्त भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रेच्या निमित्ताने संध्याकाळी मनोरंजनाचे विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
या सोहळ्याप्रसंगी संतोष पूजेरी, संजू गुडसे, सिद्धप्पा मुंडे, सत्यप्पा नागराळे, संजीव गुडसे, प्रकाश गोपाळगोळ, संजू हुब्बन्नवर, प्रकाश पूजेरी, सुभाष पूजेरी, गंगाधर कर्नुरे, नारायण हुब्बन्नवर, एकनाथ गोपाळगौडा यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments