Dharwad

मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हायकमांड घेईल

Share

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा वारंवार रंगत असताना, यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला धारवाड ग्रामीणचे काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांनी हात जोडून प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री बदलाचा विषय पूर्णपणे हायकमांडच्या अखत्यारीत असून तेच यावर अंतिम निर्णय घेतील, असे विनय कुलकर्णी यांनी म्हटले.

धारवाड जिल्ह्यात प्रवेशबंदी असल्याने कित्तूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विनय कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री बदलाचा निर्णय पूर्णपणे हायकमांडवर सोपवला. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोन्ही खंबीर नेते हायकमांडच्या सूचनांचे पालन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, हायकमांडचा आशीर्वाद मिळाल्यास आपणही मंत्री होण्यास इच्छुक असल्याचे विनय कुलकर्णी यांनी म्हटले.

पदवीधर निवडणुकीतील उमेदवारीवरून कोणताही असंतोष नसून मोहन लिंबिकाई हे योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी गोवंश हत्या बंदीवर भाष्य करताना, भाकड आणि आजारी जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या जनावरांच्या विक्रीबाबत आणि गोशाळांच्या जबाबदारीबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी विनय कुलकर्णी यांनी केली.

Tags: