अथणी मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटनावेळी आमदार लक्ष्मण सवदी यांनी आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार २५ हजार मतांच्या फरकाने विजयी होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
अथणी तालुक्यातील दरूर ते खवटकोप्प रस्ते कामाचे पूजन आणि दरूर येथील बन्नीवारी वस्तीवरील घरांसाठी निरंतर वीज पुरवठा कामाचा प्रारंभ आमदार लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी मतदारसंघातील शेतवस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘निरंतर ज्योती’ योजनेअंतर्गत प्रत्येक घराला २४ तास वीज देण्याचे आश्वासन दिले. वीज क्षेत्रातील सुधारणांसाठी ११० केव्ही आणि २२० केव्ही क्षमतेच्या पाच नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय फटकेबाजी करत, कृष्णा नदीला पाणी कोणीही सोडवलेले नसून ते नैसर्गिकरित्या येत आहे, अशा शब्दांत जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांना टोला लगावला. आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चित असून मताधिक्य २५ हजारांच्या पार जाईल, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण सवदी यांनी दिली.


Recent Comments