Dharwad

हुबळी-धारवाड बायपासवर धावत्या कारला भीषण आग

Share

हुबळी-धारवाड बायपास रस्त्यावरील इट्टीगट्टी गावाजवळ चालत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तात्काळ खाली उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून सर्वजण सुखरूप बचावले आहेत.

हुबळीकडून धारवाडच्या दिशेने जात असताना इट्टीगट्टी बायपासजवळ ही कार आली असता इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच चालकाने तत्परतेने कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवाशांना बाहेर काढले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. भररस्त्यात कार धगधगत असतानाचे दृश्य पाहून इतर वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Tags: