राज्यात हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही, या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत ‘करवे’ (शिवरामगौडा गट) कार्यकर्त्यांनी सोमवारी बेळगावमधील चन्नम्मा चौकात जल्लोष केला.

केंद्र सरकारकडून हिंदी भाषेची सक्ती करून कन्नड भाषेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करवे कार्यकर्त्यांनी केली. मात्र, राज्य सरकारने हा दबाव झुगारून हिंदी अनिवार्य नसल्याची भूमिका घेतल्याने हा कन्नडिगांचा विजय असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त करत राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.
करवे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकुडी यांनी सरकारच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले असून, प्रादेशिक भाषेचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे म्हटले.
यावेळी संगीता कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments