बेळगावमधील हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठामध्ये क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना कीर्ती शिवकुमार म्हणाल्या, महिलांनी शिक्षणासोबतच संस्कारांची जोपासना करून मुलांना सुसंस्कारी घडवावे आणि वयाचे बंधन न बाळगता स्वावलंबी जीवन जगावे.

या सोहळ्यात लेकव्ह्यू हॉस्पिटलचे डॉ. संजीव पाटील आणि डॉ. संगीता पाटील या दांपत्याला ‘आदर्श दांपत्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच चनक्का कागतीकर आणि नीता अशोक कागतीकर यांना ‘आदर्श सासू-सून’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत विदुषी सीमा कुलकर्णी यांचाही ‘प्रतिभा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत अर्श आश्रमातील मुलींच्या शिक्षणासाठी ५,५२,००० रुपयांचा आणि आराधना स्कूलला ५,००० रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द करण्यात आला.

मंगला मठद यांनी स्वागत केले, तर भारती रत्नपगोळ यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी रोहिणी इंडी, डॉ. राजेंद्र मठद, डॉ. गुडगनट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुष्प निलजगी यांनी सूत्रसंचालन तर पद्मजा तुरुमुंडी यांनी आभार मानले.


Recent Comments