Vijayapura

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा आज आलमट्टीमध्ये मुक्काम; पर्यटकांना धरण परिसरात प्रवेशबंदी

Share

बागलकोट पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज सोमवारी आलमट्टी येथे मुक्कामी येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव आलमट्टी धरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाने पूर्णपणे मज्जाव केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आगमनानिमित्त संपूर्ण धरण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ‘केबीजेएनएल’ (KBJNL) अधिकाऱ्यांनी धरणाकडे जाणारे सर्व संपर्क रस्ते बंद केले असून, मुख्य प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री आज रात्री आलमट्टी येथेच वास्तव्य करणार असल्याने या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Tags: