बेळगाव तालुक्यातील काकती येथील एचपी गॅस गोदामात कार्यरत असलेले कंग्राळी के. एच. येथील रहिवासी कामावरून गूढरित्या बेपत्ता झाले आहेत.
कंग्राळी के. एच. येथील निंगाप्पा फकिरप्पा गाणीगेर (३८) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्ती १९ मार्च रोजी नेहमीप्रमाणे काकतीमधील तेजस्विनी एंटरप्रायझेसच्या एचपी गॅस गोदामात कामावर गेली होती. गोदामाच्या चाव्या टेबलावर ठेवून तिथून बाहेर पडल्यानंतर सदर व्यक्ती पुन्हा घरी पोहोचली नाही. याप्रकरणी बेपत्ता व्यक्तीची आई कमलव्वा गाणीगेर यांनी ककती पोलिसांत दिली आहे.
बेपत्ता झालेल्या निंगाप्पा गाणींगेर या व्यक्तीची उंची ५ फूट ४ इंच, वर्ण गव्हाळ, गोलाकार चेहरा असे वर्णन असून सदर व्यक्तीने आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास काकती पोलीस ठाण्याच्या ०८३१-२४०५२०३ किंवा ९४८०८०४११५ / ९४८०८०४०८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Recent Comments