Khanapur

खानापूरच्या कॉन्स्टेबल जगदीश काद्रोळी यांचा गौरव

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष कॉन्स्टेबल जगदीश काद्रोळी यांना २०२५-२६ या वर्षातील मानाचे ‘मुख्यमंत्री पदक’ जाहीर झाले आहे.

खानापूर पोलीस ठाण्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या जगदीश काद्रोळी यांनी आपल्या १९ वर्षांच्या सेवाकाळात खून, चोरी यांसारख्या अनेक गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि तपासातील कसब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यस्तरावरील पदकासाठी केली होती. आता अधिकृतपणे हे पदक जाहीर झाले असून, २ एप्रिल रोजी बेंगळुरूमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रामाणिक सेवेला मिळालेल्या या यशामुळे खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, नागरिक आणि पोलीस दलातील सहकाऱ्यांकडून जगदीश काद्रोळी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: