Vijayapura

राज्यातील १५३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पदक जाहीर

Share

कर्नाटक सरकारने २०२५ या वर्षासाठी एकूण १५३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री पदकासाठी निवड केली असून, यामध्ये विजापूर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

पोलीस दलातील त्यांची विशिष्ट सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हे पदक जाहीर करण्यात आले आहे. विजापूर जिल्ह्यातून निवड झालेल्यांमध्ये विजापूर ग्रामीण उपविभागाचे डीएसपी तुळजप्पा सुल्पी, बसवन बागेवाडी उपविभागाचे डीएसपी बाळप्पा नंदगावी, सिंदगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कांबळे, मनगुळी पोलीस ठाण्याचे रामनगौडा बिरादार आणि गांधी चौक पोलीस ठाण्याचे चिदानंद गिडगंची यांचा समावेश आहे.

या यशाबद्दल जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: