बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात आज पहाटे ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला. भरवस्तीत लागलेल्या या आगीत दोन दुचाकी खाक झाल्या असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अथणीतील कुंभार बावी गल्लीत शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, ट्रान्सफॉर्मरखाली उभ्या असलेल्या दोन दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ही घटना घडली तेव्हा परिसरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत ही आग विझवली.
हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. जुने ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments