बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील नागनूर गावात केंद्र सरकारची ‘जलजीवन मिशन’ योजना प्रशासकीय उदासीनतेमुळे अपयशी ठरली आहे.
घराघरात नळ आणि पाईपलाईनसाठी लाखो रुपये खर्च होऊनही, गेल्या वर्षभरापासून ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
गावात प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यात आली असली, तरी त्यातून थेंबभरही पाणी येत नसल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामस्थ नियमितपणे ग्रामपंचायतीला नळपट्टीचा भरणा करत असूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा पंचायत प्रशासनासह स्थानिक आमदारांना वारंवार निवेदने देऊनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
पाण्याच्या समस्येसोबतच गावातील सांडपाण्याची व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. योग्य गटारी नसल्याने सार्वजनिक ठिकाणी घाण पाणी साचून दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागनूरचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि सांडपाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments