Accident

सवदत्ती तालुक्यात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Share

मुनवळ्ळी शहराजवळ भरधाव वेगात असलेल्या थार गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे

सवदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहराजवळ झालेल्या या अपघातात मंजू यल्लाप्पा कमतर (३५, रा. गोरवनकोळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंजू हे आपल्या दुचाकीवरून मुनवळ्ळीहून सवदत्तीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. समोरून म्हणजेच सवदत्तीकडून मुनवळ्ळीकडे येणाऱ्या थार गाडीला दुचाकीची उजव्या बाजूने जोरदार धडक बसली.

हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसताच मंजू रस्त्यावर फेकले गेले आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सवदत्ती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अतिवेग की अन्य काही कारणांमुळे हा अपघात झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags: