बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील हारूगोप्प आणि चचडी परिसरात दारू दुकानांचा सुळसुळाट वाढल्याने आज शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर चचडी येथील महिलांनी आपली व्यथा मांडली. हारूगोप्प-चचडी चौकात दारूचे दुकान सुरू झाल्यामुळे मद्यधुंद अवस्थेत रस्ता ओलांडताना अपघात होत आहेत, याला जबाबदार कोण असा सवाल महिलांनी केला. दारूमुळे घरात दररोज भांडणे होत असून कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे. महिलांवरील छळ वाढत असून गल्लीबोळातील लहान दुकानांमधून होणारी अवैध दारूविक्री देखील तातडीने बंद झालीच पाहिजे, असे चचडी येथील महिलांनी म्हटले.
या आंदोलनात चचडी गावातील शेकडो महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Recent Comments