विधान परिषदेचे सदस्य म्हणून गेल्या दोन कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाही विजयाचा पूर्ण विश्वास आहे. माझे कार्यच निवडणुकीत माझी ‘श्रीरक्षा’ ठरेल, असे प्रतिपादन पश्चिम पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार एस. व्ही. संकनूर यांनी केले.
हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेचे सदस्य एस. व्ही. संकनूर यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या दोन कार्यकाळात पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर सभागृहात सातत्याने आवाज उठवल्यामुळेच मतदारांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘एनपीएस’ ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळवून देणे आणि राज्यातील ४ लाख रिक्त पदांच्या भरतीसाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला. तसेच, केवळ बेंगळुरू किंवा म्हैसूरपुरती गुंतवणूक मर्यादित न ठेवता हुबळी-धारवाडमध्येही मोठ्या कंपन्यांनी येणे गरजेचे असून, यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराचे मोठे जाळे निर्माण होईल, असे मतही संकनूर यांनी यावेळी मांडले.


Recent Comments