खानापूर तालुक्यातील बिडी येथे समर्थ आदर्श गारमेंट ग्रुप डेव्हलपमेंट असोसिएशन आणि इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी १०:३० वाजता हलसी रोडवरील आयबी (IB) जवळ हा विशेष कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वाटप सोहळा आयोजित केला आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन स्थानिक आमदारांच्या हस्ते होणार असून, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाला तालुक्यातील महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन तालुका बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवा बागवाडकर यांनी केले आहे.


Recent Comments