Belagavi

ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न

Share

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या महांतेश नगरमधील विभागीय केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगावच्या महापौर प्रीती कामकर, राजेश्वरी हलगेकर आणि विभागीय संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी अंबिका यांच्या हस्ते करण्यात आले. माउंट अबू येथून आलेल्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी डॉ. सुनीता यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महिलेला शक्तीचे रूप मानले जाते, कारण तिच्यात सहनशीलता आणि शांती यांसारखे दैवी गुण उपजत असतात. भक्तीमार्गात याच गुणामुळे महिलांना देवीचा दर्जा दिला जातो. महिलांनी आपल्यातील या आंतरिक शक्तींना जागृत करून ईश्वरीय कार्यात स्वतःला झोकून द्यावे आणि शिवशक्ती बनून समाजाला दिशा द्यावी, असे डॉ. सुनीता यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला माहेश्वरी समाज, सकुल समाज आणि महांतेष नगर महिला मंडळाचे सदस्य, ब्रह्माकुमारी केंद्राच्या स्थानिक सेवा केंद्रातील सर्व भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: