Belagavi

बेळगावमध्ये उद्यापासून ‘होंबाळ कप’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Share

बेळगावमधील जिमखाना मैदानावर २८ आणि २९ मार्च रोजी ‘होंबाळ कप २०२५-२६’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य कर सल्लागार संघाच्या बेळगाव विभागाचे उपाध्यक्ष महांतेश गाडीगुंडी यांनी दिली.

शुक्रवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या क्रिकेट स्पर्धेत राज्यातील ११ जिल्ह्यांतील एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत. उत्तम आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व ओळखून कर सल्लागार संघातर्फे दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना तोरप्पा माळगे यांनी सांगितले की, होंबाळ कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डीसीपी नारायण बरमनी आणि मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी भोजन आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags: