दावणगेरे पोटनिवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने आता पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे संकेत दिले आहेत. पक्षात कोणताही बंडखोर उमेदवार नसून सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने रिंगणात आहेत, असा विश्वास उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे.
दावणगेरे पोटनिवडणुकीत पक्षात कोठेही बंडखोरी नाही. जमीर अहमद, नझीर अहमद, जब्बार किंवा पैलवान उस्ताद यांच्यात निवडणुकीच्या काळात काही मतभेद होणे स्वाभाविक असले तरी, अखेर हे सर्व नेते पक्षाचे ऐकणारे आहेत. कोणत्याही परिस्थितीत अल्पसंख्याक मते विभागली जाणार नाहीत, असे डी.के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीत समर्थ शिवशंकरप्पा हे शामनूर शिवशंकरप्पा यांच्यापेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. दावणगेरे शहरासाठी शिवशंकरप्पा कुटुंबाने दिलेले योगदान संपूर्ण राज्याला माहित आहे. येथील जनता या कामाचे स्मरण करत असून ते काँग्रेसलाच विजयी करतील, असे डी.के. शिवकुमार यांनी म्हटले.


Recent Comments