बेळगावमधील कॅम्प भागातील रामघाट रोडवर आज रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. येथील श्री गणेश युनियन जिमखाना ऑटो रिक्षा स्टँडच्या सदस्यांनी एकत्रित येत श्रीरामाचा जन्मोत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा केला.
बेळगावमधील कॅम्प रामघाट रोडवरील श्री गणेश युनियन जिमखाना ऑटो रिक्षा स्टँडच्या वतीने रामनवमीचे औचित्य साधून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व रिक्षा चालक बांधवांनी एकत्र येत श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. आपल्या व्यवसायासोबतच धार्मिक कार्यातही हिरीरीने सहभाग नोंदवत या चालकांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
रामनवमीनिमित्त परिसरातील नागरिक आणि भाविकांसाठी अल्पोपहार तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सुंदर कुरुबर, मारुती यादव, रूपेश पाटील, नारायण नरेर, बबन भोबे, गजानन कोलकार, प्रशांत डांगे, भरमण्णा कांबळे यांच्यासह रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य आणि शेकडो भाविक उपस्थित होते.
या भक्तीमय सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन श्रीरामाचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.


Recent Comments