बेळगावमधील शहापूर येथील वाल्मीकि राम मंदिरात आज रामनवमी अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील खासबाग परिसरातील राघवेंद्र कॉलनीमध्ये वर्षभरापूर्वी रामनवमीच्या दिवशीच श्री साई मंदिराची स्थापना करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री साईबाबांना अभिषेक, आकर्षक सजावट, होम-हवन आणि महाआरती अशा विधींनी परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.

सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिराच्या प्रगतीबद्दल आणि उत्सवाच्या नियोजनाबाबत महेश वेर्णेकर यांनी माहिती दिली.

राघवेंद्र कॉलनीतील हे साई मंदिर गेल्या वर्षभरात भाविकांचे श्रद्धास्थान बनले असून, मंदिराचा विकास वेगाने होत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
या सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले.


Recent Comments