Belagavi

बेळगावमधील वाल्मीकि राम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा

Share

बेळगावमधील शहापूर येथील वाल्मीकि राम मंदिरात आज रामनवमी अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव शहर परिसरातील एकमेव असलेल्या शहापूर येथील वाल्मीकि राम मंदिरात आज रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. कल्लाप्पा पुजारी यांच्या पौरोहित्याखाली अभिषेक, महापूजा आणि आरती संपन्न झाली. यावेळी गोधोळी येथील बेटगेरी महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम रंगला होता. या सोहळ्याला प्रोत्साहन फाउंडेशनचे सचिव संतोष होनगल, मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे हिरालाल चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते संजय चौगुले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामनवमीनिमित्त मंदिरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी आद्य कवी वाल्मीकि देवस्थान ट्रस्टचे सचिव मारुती नाईक, व्यवस्थापक महादेव शहापूरकर, राजू नाईक, अशोक नाईक, संजय शहापूरकर आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: