हुबळी रेल्वे स्थानक परिसरात एका भरधाव दुचाकीस्वाराने महिलेला धडक दिल्याने झालेल्या वादात, वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण बेदरकारपणे दुचाकी चालवत असताना त्याने एका महिलेला धडक दिली, ज्यामध्ये महिला जखमी झाली. हे पाहून घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिसाने तरुणाला हटकले आणि जाब विचारला. मात्र, आपली चूक मान्य करण्याऐवजी तो तरुण पोलिसांशीच हुज्जत घालू लागला.
तरुणाच्या उद्धट वर्तनामुळे संतापलेल्या वाहतूक पोलिसाने त्याला भररस्त्यात कानशिलात लगावून शिस्त शिकवली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


Recent Comments