Belagavi

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य चित्ररथ सजावट स्पर्धा

Share

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त बेळगावमधील होसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्ररथ सजावट स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवबौद्ध युवक मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विविध भागांतील कलात्मक चित्ररथांनी सहभाग नोंदवत जयंतीची शोभा वाढवली.

होसूर येथील नवबौद्ध युवक मंडळ आणि विनोद मोहन मॅगीनमनी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या ‘चित्ररथ सजावट स्पर्धे’मध्ये कंग्राळी बुद्रुक गावातील आंबेडकर गल्लीच्या ‘जय भीम युवक मंडळा’ने उत्कृष्ट कलाकृती सादर करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

सूरज कांबळे, राहुल कोलकार, विनोद मॅगीनमनी, मल्लेश चौगुले, युवराज तळवार आणि प्रशांत पुजारी यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. या सोहळ्यात नवबौद्ध युवक मंडळाचे सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: