हुक्केरी शहरातील हनुमान हॉटेलचे मालक राम हळ्ळूरी यांनी आपल्याच हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यवसायातील तोटा आणि वाढत्या कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

आज पहाटे सहाच्या सुमारास ५० वर्षीय राम हळ्ळूरी यांनी हॉटेल उघडल्यानंतर तिथेच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या आठवड्याभरापासून स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने हॉटेलचा व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाला होता. यामुळे हॉटेलचे भाडे आणि कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य झाल्याने ते मानसिक तणावात होते, अशी माहिती उदय हळ्ळूरी यांनी दिली.

हुक्केरी बीट पोलीस कर्मचारी रवी डंग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासात स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया पोलीस प्रशासनाने दिली आहे.


Recent Comments