Khanapur

पुदुचेरी निवडणूक तिकीट वाटपात डॉ. अंजली निंबाळकर यांची निर्णायक भूमिका

Share

खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर या सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. पुदुचेरी निवडणुकीच्या तिकीट वाटपासारखी महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी पक्ष संघटनेत आपली पकड मजबूत केली आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघातून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर आज एआयसीसी सचिव म्हणून विविध राज्यांच्या पक्ष संघटनेची धुरा सांभाळत आहेत. पुदुचेरी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १६ आणि डीएमकेला १४ जागा देण्याचा निर्णय निश्चित करण्यात डॉ. अंजली निंबाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरावरील जागावाटपाचे निर्णय घेण्यापर्यंतची त्यांची प्रगती लक्षवेधी ठरत आहे. आगामी काळात त्यांच्यावर पक्ष संघटनेत आणखी मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Tags: