Kagawad

ऐनापूर नगर पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी काँग्रेस समर्थक बिनविरोध

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूर नगर पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, यामध्ये काँग्रेस समर्थित गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. लक्कव्वा सुरेश अडिकेरी यांची अध्यक्षपदी, तर जयश्री विजय हरळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ऐनापूर नगर पंचायतीच्या मावळत्या अध्यक्षा कस्तुरी मडीवाळर आणि उपाध्यक्षा रत्नव्वा सदाशिव मादर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणुकीत कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादिमनी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

ऐनापूर नगर पंचायतीमध्ये स्थानिक आमदार राजू कागे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस समर्थित १३ सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी भाजपचे सदस्यही हजर होते. ऐनापूरमधील तरुण नेते अरुण गाणिगेर आणि प्रवीण गाणिगेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

नूतन अध्यक्षा आणि उपाध्यक्षांच्या निवडीची घोषणा होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी नगर पंचायतीचे सदस्य संजय बिरडी, कुमार जयकर, राजू हरळे, दरेप्पा हरळे, कस्तुरी मडीवाळर, सरोजिनी सुरेश गाणिगेर, रत्नव्वा मादर, दादा जंतनवर, प्रकाश नायक, सुरेश अडिशेरी, इसाक रावत, संजय कुसनाळे, प्रकाश चिनगी, गुरु मडीवाळर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: