Belagavi

मथुरेत गोरक्षक चंद्रशेखर स्वामीजींची हत्या; बेळगावमध्ये संतापाची लाट

Share

मथुरेमध्ये गोरक्षक चंद्रशेखर स्वामींच्या हत्येचा निषेध करत बेळगावमधील ‘कामधेनु अय्यप्पा सामाजिक सेवा संस्थे’ने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.

मथुरेत २१ मार्च रोजी अवैध गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रशेखर स्वामीजींना तस्करांनी वाहनाखाली चिरडून ठार केले. या घटनेच्या निषेधार्थ बेळगावमधील गोरक्षक निलेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली. गोमातेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वामीजींची अशा प्रकारे हत्या होणे, हा संपूर्ण देशासाठी धक्का असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या अमानवी कृत्यातील आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करून स्वामीजींच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे. गोरक्षकांवर होणारे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असे निलेश यांनी स्पष्ट केले.

Tags: