BENGALURU

मुख्यमंत्र्यांकडून रमजान ईदनिमित्त राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

Share

राजधानी बेंगळुरूमध्ये आज ईद-उल-फितरचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित सामूहिक नमाज पठण कार्यक्रमात सहभागी होत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

बेंगळुरूमध्ये ईद-उल-फितरनिमित्त आयोजित सामूहिक नमाज पठणानंतर उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रमजाननिमित्त सामूहिक नमाज पठण करून मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. मानवी मूल्यांची जाणीव ठेवून जगणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी परस्पर प्रेम आणि विश्वासाने राहिले पाहिजे. भारत हा विविध जाती, धर्म आणि संस्कृतींनी नटलेला देश असून आपण सर्वांनी एकतेने राहणे गरजेचे आहे. कोणताही धर्म द्वेष शिकवत नाही, तर प्रेमाचीच शिकवण देतो. त्यामुळे समाजात परस्पर प्रेम आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी म्हटले.

Tags: