BENGALURU

हिंसामुक्त जगासाठी अंहिसेचा मार्ग स्वीकारा: एच.के. पाटील

Share

पवित्र रमजान सणानिमित्त राज्याचे कायदा, संसदीय कार्य आणि पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात शांतता आणि सलोखा प्रस्थापित होऊन हिंसामुक्त जग निर्माण व्हावे, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बोलताना एच.के. पाटील यांनी अहिंसा आणि सौहार्दाच्या महत्त्वावर भर दिला.

हिंसाविरहित शांततापूर्ण जगाची आपण सर्वांनी अपेक्षा केली पाहिजे. अहिंसा आणि सलोखा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनायला हवा. रमजानचा हा सण सर्वत्र शांततेचा संदेश पसरवणारा ठरेल, अशी अपेक्षा एच.के. पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातील शेतकरी आणि सर्व कष्टकऱ्यांचे जीवन समृद्धीने न्हाऊन निघो, अशा शब्दांत त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. हा पवित्र सण समाजातील बंधुभाव अधिक घट्ट करेल, असा विश्वास एच.के. पाटील यांनी व्यक्त केला.

Tags: