Chikkodi

चिकोडीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त कृष्णा नदीचे जलपूजन

Share

चिकोडी तालुक्यातील इंगळी गावामध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येत अत्यंत भक्तीभावाने कृष्णा नदीचे जलपूजन केले.

इंगळी गावातील सासुरवाशीण माहेरी येऊन हि प्रथा पार पाडतात अशी येथील प्रथा आहे. त्यामुळे सासुरवाशिणींसह अनेक महिला, ग्रामस्थांच्या उपस्थितीत नदीकाठी कृष्णा नदीची शास्त्रोक्त पूजा करण्यात आली.

या पूजनासाठी आकर्षक आणि विशिष्ट अशा शैलीत नैवेद्यासह सर्व पूजाविधी पार पडले. यावेळी या परंपरेबद्दल सांगताना स्थानिक महिला प्रियांका डोणवाडे या म्हणाला, सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त कृष्णा नदीचे जलपूजन करण्यात आले असून उत्तम पीक पाणी, आरोग्य आणि सुखसमृध्दीची प्रार्थना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वजांपासून चालत आलेली गंगापूजन करण्याची परंपरा यावर्षीही गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात जोपासली.

Tags: