बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकले असून भाजपचे उमेदवार वीरण्णा चरंतीमठ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पत्नी राजेश्वरी यांच्यासह तहसील कार्यालयात उपस्थित राहत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सुपूर्द केला. येत्या २३ मार्च रोजी भाजपच्या वतीने भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार वीरण्णा चरंतीमठ यांनी आज तहसील कार्यालयाला भेट देऊन उमेदवारी अर्ज सादर केला. निवडणूक अधिकारी संतोष जगलासर यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सोपवला.
येत्या २३ मार्च रोजी राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून अधिकृतपणे पुन्हा एकदा अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
”या मतदार संघात भाजपसाठी पोषक वातावरण असून पोटनिवडणुकीचे गणित वेगळे असते. राज्य सरकारने येथे कितीही जोर लावला तरी भाजपला फरक पडणार नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. विकासकामांना साथ देण्यासाठी मतदारांनी भाजपला विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे,” असा विश्वास वीरण्णा चरंतीमठ यांनी व्यक्त केला.
२३ मार्च रोजी होणाऱ्या भव्य रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार गोविंद कारजोळ, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि माजी मंत्री श्रीरामुलू सहभागी होणार आहेत. तसेच बसवनगौडा पाटील यत्नाळ देखील प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे. बागलकोट क्षेत्रात एकूण २,५९,२६० मतदार असून यात १,३२,४७६ महिला आणि १,२६,७६१ पुरुष मतदारांचा समावेश आहे. २४ मार्चनंतर प्रचाराचा धडाका अधिक वाढणार असल्याची माहिती वीरण्णा चरंतीमठ यांनी दिली.


Recent Comments