Belagavi

बेळगावच्या नूतन महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदी निवड झालेल्या प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांचा कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बेळगाव महानगरपालिकेवर महापौरपदी निवड झालेल्या प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांचे विविध संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटक रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका कार्यालयात जाऊन नूतन महापौरांचा सत्कार केला.

सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. यावेळी दीपक गुडगनट्टी, सुरेश गवण्णवर, गणेश रोकडे, होळेप्पा सुलदाळ, अडिवेप्पा तल्लोरी, रमेश यरगण्णवर, प्रकाश लमाणी, सतीश गुडदवर, मंजुनाथ राठोड, लोकेश राठोड, अर्जुन कांबळे, अभिषेक अगसगी, संतोष चक्रयी, नागराज लक्कप्पगोळ, रूपाली बारिगडी आणि मधु इटगी यांच्यासह करवेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: