Bagalkot

​बागलकोटमध्ये मुसळधार पावसात मारुतेश्वर रथोत्सव संपन्न

Share

​बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील मत्तीकट्टी गावात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित श्री मारुतेश्वर रथोत्सवात पावसाने मोठा व्यत्यय आणला. मात्र, मुसळधार पाऊस आणि गारपिटीची तमा न बाळगता हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.

​बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील मत्तीकट्टी गावात आज एक आगळावेगळा भक्तीचा सोहळा पाहायला मिळाला. गुढीपाडव्यानिमित्त ग्रामदैवत श्री मारुतेश्वर देवाच्या भव्य रथोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. रथोत्सवाला सुरुवात होताच अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीला सुरुवात झाली.

​पाऊस सुरू झाल्यावर सुरक्षित ठिकाणी धाव घेण्याऐवजी भाविकांनी मारुतेश्वराचा जयघोष करत रथाचा दोर ओढायला सुरुवात केली. पावसाचा जोर वाढत असतानाही भक्तांचा उत्साह कायम होता. शेकडो भाविकांनी पावसात चिंब भिजत हा रथोत्सव यशस्वी केला.

या यात्रेसाठी बागलकोटसह गदग आणि विजापूर जिल्ह्यांतूनही हजारो भाविक आले होते. रथोत्सव पूर्ण होईपर्यंत पाऊस कोसळत होता, तरीही भक्तांनी पावसात भिजत आपला उत्साह कायम ठेवला.

Tags: