Bagalkot

बागलकोटमध्ये केएसआरटीसी बसचा अपघात

Share

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील लोकापूर येथे केएसआरटीसी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने वीज खांबाला धडकली. चालकाला डुलकी लागल्याने ही घटना घडली असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

श्रीशैल मल्लिकार्जुन देवस्थानचे दर्शन घेऊन परतत असताना लोकापूर परिसरात चालकाला डुलकी लागली आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडकली. धडकेमुळे वीज खांब मोडून बसच्या समोरील भागावर कोसळला. या घटनेत दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून चालक आणि उर्वरित २० प्रवासी सुरक्षित आहेत.

बस खांबाला धडकताच वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरू असता तर मोठी हानी होण्याची शक्यता होती, मात्र आपोआप वीज पुरवठा बंद झाल्याने अनर्थ टळला. लोकापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी लोकापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: