बेळगाव शहरात मटका आणि अवैध व्यवसायांमध्ये सक्रिय असलेल्या तीन आरोपींना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी या कारवाईचा तपशील सादर केला. मटका, जुगार आणि गांजा तस्करीसह विविध अवैध व्यवसायांत गुंतलेल्या आरोपींविरुद्ध ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये सर्फराज शेख, विनायक कोल्हापुरी आणि सागर सालगुडे यांचा समावेश आहे. या आरोपींवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असून वारंवार सूचना देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती.
या पार्श्वभूमीवर, संबंधित तिन्ही आरोपींना विजापूर, कारवार आणि यादगीर जिल्ह्यांच्या मर्यादेत ६ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
“शहरातील शांतता राखण्यासाठी आणि अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी यापुढील काळातही अशाच स्वरूपाची कठोर कारवाई सुरू राहील,” असे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.


Recent Comments