विद्यागिरी येथील शासकीय मूकबधिर शाळेतील विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलवून या महिलांनी यंदाचा महिला दिन आणि गुढीपाडवा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

बेळगावमधील विद्यागिरी येथील मूकबधिर मुलांच्या शासकीय शाळेत “वसंतसखी” आध्यात्मिक गटाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पौगंडावस्थेत पदार्पण केलेल्या सात विद्यार्थिनींची शास्त्रोक्त पद्धतीने ओवाळणी करून त्यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच शाळेतील इतर ७१ विद्यार्थिनींना नवीन कपडे आणि टॉवेल भेट म्हणून देण्यात आले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मिठाईचे वाटप करून या विद्यार्थिनींच्या जीवनात सणाचा आनंद भरण्याचे काम या महिलांनी केले आहे.

या सेवा कार्यात सुषमा जगजंपी, अपर्णा दिवाणमल, रंजना, अंजना, सुजाता पोतदार, सुषमा पाटील, संध्या कुलकर्णी, जयश्री बागेवाडी, सुनीता वासणकर आणि जयश्री तलवार यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. मूकबधिर मुलींसोबत आपला पाडवा गोड करून या गटाने महिला दिनाला एक नवा आयाम मिळवून दिला आहे.


Recent Comments