बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मरीकट्टी गावामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यात आला.

श्रमिक विकास संघ आणि बेळगावमधील जन जागरण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली, विविध महिला स्वयंसहायता गटांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य पुरस्कार विजेते साहित्यिक सिद्धण्णा इट्टनगी, श्रीशैल हंपानईक, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी शांता आणि श्रीदेवी कलमठ उपस्थित होत्या.

याप्रसंगी जन जागरण जिल्हा समन्वयक अंथनी, यशवंत, संजय यांच्यासह अंगणवाडी सेविका मादेवी पाटील, कस्तुरी कागतीमठ, संतोष सिद्धनवर आणि गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसहायता गटाच्या महिलांनी आकर्षक नृत्य आणि गायन सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी महिलांनी स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून मिळणाऱ्या फायद्यांची माहिती दिली, तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव व्यासपीठावरून सामायिक केले.


Recent Comments