Vijayapura

विजापूर जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा; बळीराजा संकटात

Share

विजापूर जिल्ह्याला काल रात्री वादळी वाऱ्यासह अवेळी पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी जोरदार गारपीट झाली आहे. कडक उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील मुद्देबिहाळ, निडगुंदी, बसवनबागेवाडी, कोलार आणि मुळवाडसह विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसासोबत पडलेल्या गारांमुळे अनेक ठिकाणी रस्ते पांढरे पडले होते. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या असून, वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

या अवेळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे विजापूर जिल्ह्यातील मुख्य नगदी पिके असलेल्या द्राक्ष आणि डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: