Belagavi

बेळगावात धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासची सांगता

Share

बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित ‘धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास’ची आज भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिनाभर चाललेल्या या विशेष उपक्रमाची समाप्ती महाराजांच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली.

बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य मूर्तीला विशेष अभिषेक आणि पूजा अर्पण करून बलिदान मासाची सांगता झाली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, युवासेनेचे विनायक हुलजी आणि तानाजी पावशे यांच्या हस्ते हे पूजन पार पडले. संभाजी महाराजांचा त्याग आणि बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने आयोजित या महिनाभराच्या कार्यक्रमात शेकडो शिवसैनिक सक्रियपणे सहभागी झाले होते.

या पूजन सोहळ्याप्रसंगी उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, विठ्ठल उंदरे, एस. के. पोटे, पी. जे. घाडी, संजय चतुर, राजू कनेरी, बाळू सुनील चव्हाण, पाटील भोसले, संदीप धामणेकर, बाळकृष्ण चव्हाण पाटील आणि गजानन वेर्णेकर यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Tags: