मिरजमधील नामांकित ‘सचिन हॉस्पिटल’ व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या वतीने रविवार, दिनांक २२ मार्च रोजी अपत्यहीन दांपत्य आणि स्त्री रोगांवर मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरज मधील शिवाजी रोडवरील हॉटेल प्रियदर्शनी जवळ असलेल्या सचिन हॉस्पिटलमध्ये सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये अपत्यहीन दांपत्यांना सचिन हॉस्पिटलमधील तज्ज्ञ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय डॉक्टरांच्या टीमकडून मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये तपासणी, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा सचिन हॉस्पिटल उपलब्ध करून देणार आहे. औषधोपचार, आय.यू.आय. आणि टेस्ट ट्यूब बेबी यांसारख्या आधुनिक पर्यायांवरही या ठिकाणी सविस्तर चर्चा केली जाईल.
स्त्रियांमधील बंद गर्भनलिका जोडणे, स्त्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या गाठी आणि वारंवार होणारे गर्भपात यांवर सचिन हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार केले जातील. तसेच स्त्रियांमधील कर्करोग आणि वजन कमी करण्याबाबतही मार्गदर्शन मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरून अपत्यहीन दांपत्यांना मातृत्वाचे सुख मिळवून देणे हा सचिन हॉस्पिटलचा मुख्य उद्देश आहे.
पुरुषांच्या वंध्यत्व समस्यांसाठी सचिन हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र तपासणीची सोय करण्यात आली आहे. शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा लैंगिक समस्यांवर आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. आय.व्ही.एफ. आणि इक्सी यांसारख्या प्रगत प्रयोगशाळांच्या मदतीने वंध्यत्वावर मात करणे शक्य असून अधिक माहितीसाठी डॉ. सचिन (९४२२५८०८४२, ९७६५०१०८३४) किंवा डॉ. नेहा (९४२१९३२४०१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments