Belagavi

बेळगावमधील अमन नगरमध्ये भुयारी गटार योजनेच्या कामाला प्रारंभ

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील अमन नगरमध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार आसिफ सेठ यांनी आज या कामाचे भूमिपूजन करून परिसरातील सांडपाणी व्यवस्थेच्या प्रश्नावर तोडगा काढला.

बेळगाव उत्तर मतदारसंघातील अमन नगरमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या भुयारी गटार कामाचे आमदार आसिफ सेठ यांनी भूमिपूजन केले. या प्रकल्पामुळे परिसरातील सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, स्थानिक नागरिकांना उत्तम स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे. मतदारसंघातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि जनतेच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आसिफ सेठ यांनी यावेळी म्हटले.

याप्रसंगी स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमन नगरमधील नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी आमदारांनी उचललेल्या या पावलाचे उपस्थितांनी स्वागत केले. सुधारित भुयारी गटार योजनेमुळे या भागातील लोकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली असून, स्वच्छतेच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळणार असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली.

Tags: