Belagavi

​यमनूर अज्जा यात्रोत्सवाचा भक्तिमय वातावरणात समारोप

Share

सलग सहा दिवस भाविकांच्या उत्साहात साजरा झालेला श्री चांगदेव उर्फ राजाबागसवार यमनूर अज्जा यात्रोत्सवाची आज श्री गुरु सुभाष अज्जा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगता झाली.

बेळगाव मधील श्रीनगरमध्ये यमनूर अज्जा यात्रोत्सव सहा दिवस अत्यंत वैभवात साजरा करण्यात आला. समारोप समारंभाला श्री गुरु सुभाष अज्जा यांच्यासह सेवा समितीचे प्रमुख महांतेश चव्हाण, लोकेश गौडा, गिरीश भस्मे, बसवराज माळगी, बसवराज दोंडमनी यांसह अन्य सदस्य उपस्थित होते. वाद्यवृंदाचा गजर, भक्तिपूर्ण भजने आणि भंडारा उत्सवाच्या माध्यमातून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या यात्रोत्सवाने धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवले.

Tags: