Vijayapura

आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही : उपमुख्यमंत्री

Share

उत्तर कर्नाटकची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीवरील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत तूर्तास कोणताही निर्णय झालेला नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

२०१० च्या लवादाच्या आदेशानुसार कर्नाटक आपल्या वाट्याचे पाणी वापरण्याच्या तयारीत असताना आंध्र प्रदेश सरकारकडून त्यात वारंवार अडथळे निर्माण केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंध्र प्रदेशच्या असहकार्यामुळे तुंगभद्रा धरणातील ३० टीएमसी पाणी वाया जात असून, या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी मंगळवारी दिल्लीत खासदारांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्री एच. के. पाटील, एम. बी. पाटील आणि बोसराज यांच्यासह आपण दिल्लीला जात असल्याची माहिती डी. के. शिवकुमार यांनी दिली.

Tags: