अथणी तालुक्यातील रड्डेरहट्टी येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या वतीने एका गरजू लाभार्थ्याला हक्काचे घर प्रदान करण्यात आले.
ग्रामीण विकासाच्या उद्देशाने सुरू असलेल्या या उपक्रमातून बेघरांना हक्काचे छप्पर उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती जिल्हा संचालिका नागरत्न हेगडे यांनी दिली आहे.
गिरिमल्ला बसप्पा चिगरी या लाभार्थ्याला ‘वात्सल्य’ योजनेअंतर्गत बांधून दिलेल्या घराची किल्ली यावेळी सुपूर्द करण्यात आली. पूज्य वीरेंद्र हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था पाणी पातळी वाढवण्यासाठी एक हजार तलावांच्या पुनरुज्जीवनाचे कार्यही करत आहे. घराचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल लाभार्थ्याने संस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.


Recent Comments