Vijayapura

विजापूरमध्ये भूजल पातळीत मोठी वाढ; बोरवेलला लागले मुबलक पाणी

Share

विजापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेल्या प्रभावी सिंचन योजनांमुळे भूगर्भातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. बबलेश्वर मतदारसंघातील अरकेरी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात बोरवेल मारताना पाण्याची मोठी धार आकाशाच्या दिशेने उसळल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

विजापूर जिल्ह्याची ओळख एकेकाळी दुष्काळी प्रदेश अशी होती. हजारो फूट खोल बोरवेल खोदूनही पाणी लागत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असत. मात्र, जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांनी राबवलेल्या सिंचन आणि तलाव पुनरुज्जीवन योजनांमुळे या भागाचे चित्र बदलले आहे. अरकेरी येथील शेतकरी अमसिद्ध भीमसीगौडा बिरादार यांच्या शेतात बोरवेल मारत असताना सुमारे २५० ते ३०० फुटांवरच पाण्याचा मोठा प्रवाह लागला. ही जलधारा थेट उंचावर उसळल्याने या भागातील सुपीकतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Tags: